Breaking News

6/recent/ticker-posts

पालघर पोलीस दलाची मोठी कारवाई! अमलीपदार्थ तस्करीचा पर्दाफाश, ६ जणांना अटक – लाखोंचा मुद्देमाल जप्त


पालघर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – अमलीपदार्थ प्रकरणात ६ आरोपी गजाआड.

पालघर,जनतेचा वाली. दि. ६ जून २०२५ – पालघर जिल्ह्यातील अमलीपदार्थ प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत ६ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.

पालघर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी . प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष पथकाने २४ एप्रिल २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत पालघर-बोईसर परिसरात गुप्त माहितीच्या आधारे छापे टाकून दोन प्रकरणांत अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला.

या कारवाईत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कब्जातून ५४,०००/- रुपये किंमतीचा ८ किलो २५३ ग्रॅम गांजा, २,००,०००/- रुपये किंमतीचे १३३ ग्रॅम कोकेन, ४,०००/- रुपये रोख रक्कम आणि ४,००,०००/- रुपये किंमतीची एक डिजायर कार (एमएच ४८ डीएस १९८०) असा एकूण ६,५८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

  1. बोईसर पोलीस ठाणे – गु.र.क्र. २४३/२०२५, एनडीपीएस अधिनियम कलम ८ (क), २० (ब), (ii)
  2. पालघर पोलीस ठाणे – गु.र.क्र. १६५/२०२५, एनडीपीएस अधिनियम कलम ८ (क), २० (ब), (ii)
  3. पालघर पोलीस ठाणे – गु.र.क्र. १६३/२०२५, एनडीपीएस अधिनियम कलम ८ (क), २१ (ब)

या कारवाईत अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल हटकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी – प्रदीप पाटील, संतोष सूर्यवंशी, सागर सरदार, राकेश पाटील, भगवान अहळाद, दिनेश गायकवाड, कैलास पाटील, कपिल नेमाडे, गणेश पाटील, प्रकाश निकम आणि जमादार यांचा सहभाग होता.

पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पुढील काळातही अमलीपदार्थ विरोधी कारवाई तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Thanks & Best Regards

JANTECHA WALI

Chief Editor - Vijay M. Gharat
Mob. : +91 9764820588

Post a Comment

0 Comments